फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम

गेल्या दोन वर्षांत मोबाइल डिव्हाइसमध्ये कोणाचे राज्य निर्माण झाले , असा प्रश्न विचारल्यास उत्तर अँड्रॉइड डिव्हाइस असे आहे. ओपन ऑपरेटिंग प्लॅटफॉर्म असल्याने आणि वापरण्यास सोपे असल्याने अनेक मोबाइल उत्पादक कंपन्यांनी गुगल या कंपनीच्या अँड्राइड या ऑपेरटिंग सिस्टिमच्या आधारावर अनेक मोबाइल बाजारात आणले. सॅमसंग ही कंपनी याबाबत आघाडीवर आहे. पाच वर्षांपूर्वी मोबाइल बाजारपेठेत सॅमसंगचा हिस्सा फार कमी होता. स्मार्टफोनमध्ये नोकिया , तर बिझनेस फोनमध्ये ‘ रिम ‘ चा ब्लॅकबेरी हे फोन आघाडीवर होते. मात्र ,सॅमसंग या कंपनीने अँड्राइड या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित मोबाइल हँडसेट बाजारात आणून स्मार्टफोनची परिभाषाच बदलू टाकली. जागतिक पातळीवर स्मार्टफोनमध्ये अॅपल आणि सॅमसंगमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अँड्राइडमुळे अनेक परदेशी आणि भारतीय कंपन्यांनी मोबाइल हँडसेट उत्पादनात प्रवेश केला. परिणामी , स्पर्धा वाढल्याने स्मार्टफोन हा सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. दहा हजार रुपयांपर्यंत एकादा चांगला स्मार्टफोन मिळू शकतो. 


मोबाइलच्या बाजारपेठेत अँड्रॉइडवर आधारित मोबाइलचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यानंतर नोकिया , रिमच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. गुगल कंपनीच्या अँड्राइड मोबाइलच्या ऑपेरटिंग सिस्टिमला स्पर्धा देण्यासाठी फायरफॉक्स ही इंटरनेट ब्राउझर कंपनी पुढे सरसावली आहे. कंपनीच्या नव्या मोबाइल ऑपेरटिंग सिस्टीमवर आधारित स्मार्टपोन जुलैमध्ये बाजारात येणार आहेत. जगभरातील १३ कंपन्यांनी फायरफॉक्सच्या मोबाइल ऑपेरटिंग सिस्टिमवर विश्वास दाखविला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हँडसेटला लागणाऱ्या हार्डवेअरच्या तुलनेत कमी क्षमतेच्या हार्डवेअरवर नवी ऑपरेटिंग सिस्टीम चालू शकणार आहे , असे मोझिलाचे म्हणणे आहे. कंपनीची ही ऑपेरटिंग सिस्टिम ओपन सोर्स आणि वेबवर आधारित , तसेच यावर थर्टपार्टी डेव्हलपरना अनेक अॅप्लिकेशन विकसित करता येऊ शकणार आहेत. यासाठी कोणतेही उत्पन्न शेअर करावे लागणार नाही. एलजी , झेटीई आणि हुवेई या कंपन्यांनी फायफॉक्सच्या ऑपरेटिंग सिस्टिमवरील हँडसेट लाँच करण्याची तयारी दर्शविली आहे. बार्सिलोनात पुढील आठवड्यात होत असलेल्या एका परिषेदत डिव्हाइस लाँच होण्याची अपेक्षा आहे. अँड्राइडपेक्षा कमी क्षमतेच्या हार्डवेअरची गरज याला लागणार असल्याने लोकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे.

Exit mobile version