फेसबुकचे नवे रूप : आता तुमचे प्रोफाइल होईल रंग-‍बेरंगी

फेसबुकचे नवे रूप : आता तुमचे प्रोफाइल होईल रंग-‍बेरंगीफेसबुकने न्यूज फीड नव्या स्वरूपात ग्राहकांसाठी  आण्‍ाला आहे. तो पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक  आहे.मोबाईलमध्‍ये सहज वापरण्‍याजोगे फोटो,संगीत व गेम्स या अ‍ॅप्लिकेश्‍ानला त्यात अधिक जागा दिलेली आहे.फेसबुकचा संस्‍थापक मार्क झुकेरबर्गने सॅनफ्रॅन्सिस्को येथे न्यूज फीडच्या डिझाईन व त्यात केलेल्या बदलांची माहिती दिली.

न्यूज फीडचा उपयोग वापरकर्त्यांना संकेतस्थळांसारखा करता येईल.ज्यात मोठ्या छायाचित्रांसारख्‍या गोष्‍टी असतील.नव्या डिझाइन मध्‍ये न्यूज फीडला अधिक  व्हिज्युल्स  देण्‍यात आले आहे.त्यात कंटेंटमध्‍ये  50 टक्के फोटोंचा भाग असेल जो की पूर्वी 25 टक्के होता.फेसबुकने या नव्या न्यूज फीडमध्‍ये महसूल जमा करण्‍यासाठी जहिरातींना अग्रक्रम दिल्याने  जहिरातीच अधि‍क दिसतील.
तुमचे  फेसबुक प्रोफाइल पिक्चर खूप मोठे दिसेल.यात फोटो अल्बम मधोमध पाहता येईल. तुमचे म्युच्यूल मित्र कव्हर इमेजवरती दिसतील व त्यांचे प्रोफाइल पिक्चर शेअर केलेल्या पोस्टवर दिसू शकेल.तसेच नव्या न्यूज फीडमध्‍ये चॅटबारचा इतिहास पाहणे ही शक्य होईल.  याचा मुख्‍य उद्देश युजरला मोबाइलवर वर्तमानपत्र किंवा मासिक उपलब्ध करून देणे हे आहे.मल्टीपल फीड या पर्यायामुळे न्यूज फीडवर यूजर कंटेंट आणि पोस्‍टला योग्य जागा मिळते. न्यूज फीडच्या डाव्या बारमध्‍ये छायाचित्रांसह दुसरे ही अपडेट दिसतील.संगीत व गेम्ससाठी वेगळे टॅब बनवले गेले आहे.नव्या न्यूज फीडच्या कंटेंटमध्‍ये 50 टक्‍के छायाचित्रांचा भाग असेल,जो पूर्वी 25 टक्के होता न्यूज फीडमध्‍ये खालील वैशिष्‍ट्ये आहेत  ;
ऑल फ्रेंडस्:येथे तुम्ही मित्रांना पाठवलेले  फेसबुकवरील स्टेटस् मॅसेज,लिंक  पाहावयास मिळेल.
फोटो : तुमच्या मित्रांनी शेअर केलेले छायाचित्रे आणि तुम्ही लाइक्स केलेले फोटो दिसतील.
संगीत : म‍ित्र आणि तुम्ही ऐकलेली गाणी ,तुमच्या आवडत्या कलाकारांची माहिती व त्यांनी फेसबुकवर
शेअर केलेल्या गोष्‍टी पाहावयास मिळतील.
फॉलोईंग : तुम्ही लाइक्स केलेली पाने,आणि फेसबुकवर तुम्ही ज्या सेलिब्रिटीला फॉलो करता, त्यांची
लेटेस्ट फीड राहिल.

फेसबुकचा नवीन न्यूज फीड केव्हा येईल व यूजर्स त्याच्याशी कसे कनेक्ट होतील  ? सद्य:स्थितीत न्यूज फीडचा फेसबुक प्रयोग करत आहे.जर तुम्हाला या न्यूज फीडशी कनेक्ट व्हायचे असेल तरfacebook.com/about/newsfeed या वेब पानाच्या खाली हिरव्या रंगाचा क्ल‍िकेबल बटन
आहे,तिथे joing waiting list असे बटन आहे.त्यावर क्लिक करा आणि नव्या व आकर्षक न्यूज  फ‍ीड फेसबुकची  पाने पाहा.
   

Exit mobile version