टॅब्लेटच्या दुनियेतील स्वस्त ‘देसी तडका’

गुगल असो की अॅपल , सॅमसंग असो की एचटीसीसारख्या मल्टिनॅशनल कंपन्या किंवा मायक्रोमॅक्स , कार्बन आणि झिंकसारख्या भारतीय कंपन्याही असोत. आजघडीला स्मार्टफोन निर्मितीत असणाऱ्या प्रत्येक कंपनीला टॅब्लेट फोन निर्मितीचा मोह पडतो आहे. आणि त्यातही विशेषतः भारतीय बनावटीच्या कंपन्यांनी तरुणाईची नाडी ओळखत मल्टिफीचर्स आणि तुलनेने स्वस्त असे टॅब्लेट्स बाजारात सादर केले आहेत. 
……….. 


‘ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ‘ ने (एमएआयटी) आपल्या एका अहवालात देशातील टॅब्लेट पीसीची बाजारपेठ विस्तारून २०१५-१६पर्यंत प्रतिवर्षी ७० लाख युनिट विक्रीच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. सध्या आपल्याकडे प्रतिवर्षी १० लाखांहून अधिक टॅब्लेटची विक्री होते. या पार्श्वभूमीवर अॅपल , सॅमसंग , एचटीसी , एलजी या नामवंत कंपन्यांसह अन्य किमान २५ कंपन्यांचे टॅब्लेट पीसी सध्या बाजारात उपलब्ध आहेत. कॉलिंग आणि एचडी क्वालिटी टच स्क्रीन या फीचर्समुळे हल्लीची तरुण पिढी स्मार्टफोनपेक्षा टॅब्लेटच्या प्रेमात पडली आहे. या दोन कारणांपेक्षा स्पर्धक कंपन्यांची संख्या वाढल्यामुळे टॅब्लेटच्या किमतीही तरुणाईच्या आवाक्यात आल्या आहेत. 


आजच्या ‘ ट्रेंड्स ‘ मध्ये आपण भारतीय बाजारपेठेतील कंपन्यांचे हटके आणि तरुणाईच्या खिशाला सहज परवडतील , अशा टॅब्लेट्सची माहिती घेणार आहोत. 
………. 


मायक्रोमॅक्स फनबुक इन्फिनिटी पी २७५ 
मायक्रोमॅक्स या अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या भारतीय कंपनीने ‘ फनबुक ‘ या नावाने बाजारात उतरविलेल्या सीरिजने चांगलीच पकड मिळवली आहे. इतर स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेने स्वस्त आणि टेक्निकली सुपिरिअर उत्पादने असल्याने कंपनीच्या टॅब्लेटची मागणी वाढत आहे. 
फीचर्स : 
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ४.० 
१.२ गिगाहर्टझ प्रोसेसर 
७ इंचाची कपॅसिटीव्ह टच स्क्रीन 
२ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा 
०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा 
४००० एमएएचची स्ट्राँग बॅटरी 
वायफाय आणि थ्रीजी उपलब्ध 
४ जीबी इनबिल्ट स्टोरेज 
मायक्रो एसडी कार्ड 
किंमत : रु. ४ , ७५०* 
………… 

एसर आयकॉनिया बी १-ए७१ 
अमेरिकेतील लास वेगास येथे जानेवारी २०१३ मध्ये आयोजिन ‘ इंटरनॅशनल कंझ्युमर शो ‘ मध्ये लाँच झालेला बजेट टॅब्लेट. 
फीचर्स : 
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड जेली बीन 
सात इंची टचस्क्रीन 
रिझोल्युशन : १०२४* ६०० 
१.२ गिगाहर्टझ प्रोसेसर 
५१२ एमबी रॅम 
८ जीबीची इंटर्नल मेमरी 
जीपीएस आणि ब्लूटूथची सुविधा उपलब्ध 
किंमत : रु. ७ , ९९९* 
……….. 



झिंक झे १००० 
टॅब्लेट बाजारपेठेतील अन्य कंपन्यांच्या टॅब्लेटपेक्षा आकाराने मोठा असणाऱ्या झिंक झे १००० ची सध्या चलती आहे. याचा स्क्रीन ९.७ इंचाचा आहे. 
फीचर्स : 
स्क्रीन रिझोल्युशन १०२४*७६८ 
सिम कार्डची सुविधा 
८ जीबी इनबिल्ट मेमरी 
दोन मायक्रो यूएसबी पोर्ट 
मिनी एचडीएमआय पोर्ट 
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ४.० 
१.५ गिगाहर्टझ प्रोसेसर 
१ जीबी रॅम 
बॅक आणि फ्रंट कॅमेरा 
याशिवाय टॅब्लेटच्या खरेदीवेळी कंपनीतर्फे पाउच , स्क्रीन प्रोटेक्टर , हेडफोन , यूएसबी डेटा केबल आणि ‘बिगफ्लिक्स ‘ ची एका महिन्याची ‘ मूव्ही ऑन डिमांड ‘ सेवा मोफत उपलब्ध. 
किंमत : रु. १० , ९९०* 
……… 


व्हिडीओकॉन व्हीटी ७१ 
अन्य घरगुती आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये अग्रेसर असणाऱ्या ‘ व्हिडीओकॉन ‘ ने टॅब्लेट बाजारपेठेत तशी उशिराच एन्ट्री घेतली. ‘ व्हीटी७ ‘ सोबत येणारी एचडीएमआय केबल हे या टॅब्लेटचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ही केबल टीव्हीला जोडता येते. त्याद्वारे टॅब्लेटवरील व्हिडीओ अथवा क्लिपिंग्ज टीव्हीवर पाहता येणे शक्य आहे. 
फीचर्स : 
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ४.० अथवा आइस्क्रीम सँडविच 
१.२ गिगाहर्टझ प्रोसेसर 
४ जीबीची मेमरी (३२ जीबीपर्यंत वाढविता येते) 
५१२ एमबी रॅम 
एचडीएमआय आणि यूएसबी केबल 
किंमत : रु. ४७९९* 
……… 

वॅमी डिझायर 
टॅब्लेटच्या स्पर्धेतील आणखी एक भारतीय ब्रँड असणाऱ्या ‘ विक्ड लीक ‘ या कंपनीचा हा टॅब्लेट. अँड्रॉइड ४.१ किंवा जेली बीन या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ‘ वॅमी डिझायर ‘ उपलब्ध आहे. हाय मेमरी अॅप्सकरीता हा टॅब्लेट अत्यंत उपयुक्त असल्याचा निमार्त्यांचा दावा आहे. 
फीचर्स : 
ड्युएल कोअर १.५ गिगाहर्टझ प्रोसेसर 
१ जीबी रॅम , ७ इंची टच स्क्रीन 
वायफाय उपलब्ध , एचडीएमआय पोर्ट , ८ जीबीची इंटर्नल मेमरी , एक्स्पांडेबल मेमरी ३२ जीबी , टॅब्लेटसह स्क्रीन गार्डही उपलब्ध , मायक्रो यूएसबी आणि यूएसबी केबलही उपलब्ध 
किंमत : रु. ६४९९* 
……… 


बियाँड एमआय बूक एमआय ३ 
पुण्यातील ‘ बियाँड टेक इलेक्ट्रॉनिक्स ‘ ने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टच स्क्रीन प्रॉडक्ट्सची मोठी सीरिज लाँच केली. त्यात टॅब्लेटमधील एमआय या सीरिजचा समावेश आहे. 
फीचर्स : 
८ जीबीची इनबिल्ट मेमरी (३२ जीबीपर्यंत वाढविता येते) 
एसडी कार्ड 
कपॅसिटिव्ह टच स्क्रीन विथ कायनेटिक स्क्रोलिंग , ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ४.० 
१.२ गिगाहर्ट्झचा प्रोसेसर 
वायफाय अथवा थ्रीजी डोंगलच्या साह्याने इंटरनेटची सुविधा , भारतीय भाषांचाही टॅब्लेटमध्ये समावेश , २ मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा , ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा 
थ्रीडी व्हिडीओ आणि गेमिंग सपोर्ट 
किंमत : रु. ६११९* 
……… 


यूबीस्लेट ७ सी प्लस 
केंद्रीय मनुष्यबळ खात्यातर्फे खास विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात येणाऱ्या ‘ आकाश २ ‘ चे ‘यूबीस्लेट ७ सी प्लस ‘ हे भावंड होय. या कॅटेगरीमध्ये बाजारात उपलब्ध असणाऱ्या टॅब्लेटच्या तुलनेत हा वजनाने अत्यंत हलका आहे. 
फीचर्स : 
७ इंचाची स्क्रीन 
ऑपरेटिंग सिस्टिम : ४.० अँड्रॉइड 
१ गिगाहर्टझचा प्रोसेसर 
५१२ एमबी रॅम 
वायफाय , जीपाआरएसच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा 
सिमकार्डची सुविधा उपलब्ध (मात्र , ब्लूटूथ नाही) 
मायक्रो यूएसबी , यूएसबी अॅडाप्टर उपलब्ध 
४ जीबीची इंटर्नल मेमरी , मायक्रो एसडी कार्ड 
किंमत : रु. ४९९९* 

कार्बन टा फोन :  Rs . 10000

>> विहंग घाटे 

Exit mobile version