अंतिम मुलाखतीसाठी दिल्लीला येण्यासाठी रक्कमजमा करा , अशा आशयाचा ई – मेल एकाला आला ; तसेच तुमच्या विरूद्ध स्थानिक कोर्टात खटला दाखल झालाआहे , अशा आशयाचेही ई – मेल येऊ लागले आहेत . असे ई – मेल हे पूर्ण अभ्यास करूनच पाठविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्या प्रमाणात सायबरगुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे . इंटरनेट वापरणारे नवखे युजर , अशा ई – मेलना बळी पडत आहेत . इंटरनेट स्कॅमचा सर्वांत मोठा स्रोत भारत होता . पण आता हा क्रम बदलला असून चीन आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांकलागतो आहे , असे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे म्हणणे आहे .
काही दिवसांपूर्वी चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्याने दंड जमा करण्याची मागणी करणारा एक मेल चेन्नईत एकाला मिळाला . त्यात क्रेडिट कार्डने पेमेंट करण्यासाठीच्या अनेक लिंक किंवा स्टेट बँकेच्या अमूक एकाअकाऊंटमध्ये पैसे भरा , असे लिहिले होते . मात्र , पोलिसांकडून असा कोणताही ई – मेल पाठविण्यात आलानसल्याचे स्पष्ट झाले . त्यामुळे वकील , पोलिसांच्या नावाचा वापरही सायबर गुन्हेगार करू लागले आहेत .
इंटरनेट वापरणाऱ्यांनी कोणताही पैसे मागणाऱ्या ई – मेल आल्यास त्याला प्रतिसाद देता काम नये . बँका कधीहीई – मेलमार्फत पैशाची मागणी करीत नाहीत . त्यामुळे इंटरनेट युजर्सनी अशा ई – मेलबाबत सजग राहण्याचीगरज आहे . ई – मेलमध्येही एखादा मेल फिशिंग स्कॅम असल्याचे नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झाली आहे . ‘अनेक लोकांनी यास फिशिंग स्कॅम मेल , असे शेरा दिला आहे . त्यामुळे यात असुरक्षित आशय असू शकतो ,’ असेनोटिफिकेशन मेलमध्ये येत आहे . त्यामुळे त्याकडे युजरनी लक्ष द्यायला हवे .
email, junk, spam