सततचे नवे मेसेज आणि मेलमुळे जुने ई-मेल आणि टेक्स्ट मेसेज मागे पडत राहतात किंवा जागेच्या कमतरतेमुळे ते डिलिट करावे लागतात. त्यामुळे कधीकधी तुम्ही प्रिय व्यक्तीने पाठवलेला मेसेज जपून ठेवू शकत नाहीत. अनेकदा फोन बदलतानाही बॅकअप घेणे कठीण जाते, पण आता ब्लॅक बॉक्स डिव्हाइसच्या मदतीने मोबाइलमधील मेसेज किंवा ई-मेलची तत्काळ प्रिंट घेऊ शकता. कॉर्डद्वारे हे उपकरण फोनशी तत्काळ जोडता येते. मोबाइल, लॅपटॉपला सहज जोडता येणारे हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे. त्यामुळे प्रिंट काढण्यासाठी ते कुठेही नेता येते. न्यूयॉर्कमध्ये राहणार्या जो डोसेट या अमेरिकन डिझायनरने हे उपकरण बनवले आहे. आपल्या मोबाइलमधील मेसेज इतरांना दाखवण्यासाठी त्याची दुसरी प्रतही या उपकरणाद्वारे काढता येते.