मायक्रोसॉफ्टने आपला पहिला टु-सरफेस स्लेट लाँच केला आहे. यात टॅब्लेट विंडोज-8 आरटी आहे. हा सर्वोत्तम ठरेल किंवा ‘इंटेल आय 5-पॅकिंग विंडोज8 प्रो’कडून चांगल्या परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवता येईल याबाबत सरफेस आरटीवर एक रिपोर्ट…
मायक्रोसॉफ्ट सरफेस आरटी
किंमत 38,840 (32 जीबी)
1 आयपॅडच्या तुलनेत सरफेसचा आकार मोठा व रुंदी 30 एमएम जास्त आहे. पोर्टेटप्रमाणे धरल्यास हे गॅजेट लांब व पातळ दिसेल. 16:9 स्क्रीनवर एचडी चित्रपट पाहण्याचा अद्भुत अनुभव घेता येईल. आयपॅडचा स्क्रीन रेशो फक्त 4:3 आहे.
2 सरफेस आरटीची बिल्ट क्वालिटी जबरदस्त आहे. याची मॅग्नेशिअम व्हेपरएमजी चेसिस सुंदर आहे. याच्या डिझाइनमध्येच मजबुती दिसून येते. स्क्रीनमध्ये गोरिला ग्लास वापरला आहे. बटन व सॉकेटही योग्य ठिकाणी लावलेले आहेत.
3 टेग्रा आर्किटेक्चरवर अॅप्सचा वापर करणे सोपे आहे. एचडी स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा आनंद द्विगुणित होईल. बॅटरी बॅकअपही चांगला आहे. या गॅजेटवर मल्टिटास्किंग अवघड आहे.
4 आकार मोठा असूनही हा वजनाला हलका आहे. टॅब्लेटबरोबर टच-कव्हर जोडणे सोपे आहे. कॉम्प्युटर-की आभासी असूनही टायपिंग करणे अवघड नाही. टेग्रो टेकचा परफॉर्मन्स चांगला आहे.
5 टॅब्लेट विंडोज ऑ फिसप्रमाणे वापरता येतो. त्याचे टच कव्हर पातळ आणि स्पिल प्रूफ आहे. तसेच टाइप कव्हर मजबूत आहे. दोहोंचा परफॉर्मन्स चांगला आहे. टाइप कव्हर जरा फिल्मी आहे.
6 मायक्रोसॉफ्ट सरफेसमध्ये ‘720 पी’चे दोन कॅमेरे आहेत. स्काइपसाठी एक कॅमेरा समोरच्या बाजूला लावला आहे. दुसरा कॅमेरा मागच्या बाजूला बसवला आहे.