1. Bit.ly
यूआरएल छोटी करून देण्याची सेवा देणाऱ्या वेबसाइट्समध्ये ही एक आघाडीची वेबसाइट . यामध्ये तुम्हालासुरुवातीला इ – मेल आयडी वापरून अकाऊंट तयार करावे लागते . त्यानंतर तुम्ही यूआरएल अॅड करू शकता . हीयूआरएल शेअर करताना शॉर्ट स्वरुपात दिसते . याठिकाणी बंडल करून अनेक यूआरएल एकाचवेळी शेअरहीकरता येतात . याठिकाणी युआरएल बरोबरच फोटो , डॉक्युमेंट , ई – बुक अॅड करता येतात . हे बंडल किंवा सिंगलयुआरएल तुम्ही फेसबुक , ट्विटरवर शेअर करू शकता किंवा ई – मेलही करता येईल .
2. BridgeURL
यूआरएल शॉर्ट करण्यासाठी ही वेबसाइट bit.yl चीच मदत घेते . पण तरी त्यासाठी कुठलंही अकाऊंट तयार करावंलागत नाही हा या वेबसाइटचा मोठा प्लस पॉइंट . याठिकाणीही यूआरएलसाठी टायटल देऊन यूआरएल अॅडकरून थेट शेअर करू शकता . एकापेक्षा अधिक यूआरएल बंडल केल्या असतील तर ओपन करताना त्या स्लाइड शोप्रमाणे दिसतात . याठिकाणी अकाऊंटही तयार करता येते . त्याचा उपयोग करून लिंक अॅड करता येतात , काढूनटाकता येतात .
3. MinMu
यूआरएल शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही आणखी एक वेबसाइट . कुठलेही पाच नंबर टाइप करा ,टायटल द्या , यूआरएल टाइप करा किंवा पेस्ट करा आणि जनरेट मेन्यूवर क्लिक करून तुम्ही शॉर्ट लिंक तयार करूशकता . ही लिंक फेसबुक किंवा ट्विटरमध्ये पेस्ट करून शेअर करू शकता . मात्र या हायपरलिंक नसल्याने कॉपी -पेस्ट करूनच काम करावे लागते , ही या वेबसाइटची एक त्रुटी आहे . याठिकाणी लॉगिनची सोय नसल्याने तुमच्यालिंक साठवून ठेवता येत नाहीत .
4. Fur.ly
लिंक शॉर्ट करण्याची किंवा बंडल करण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे . केवळ यूआरएल टाइप करा , सिक्युरिटीकोड टाइप करा आणि एंटर क्लिक केले की झाली तुमची शॉर्ट लिंक तयार . या लिंकला तुमच्या सोयीचे टायटलदेण्याचीही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहे . या वेबसाइटवर तुमचे अकाऊंट असेल तर सिक्युरिटी कोड टाइपकरण्याचीही गरज नाही . मात्र याठिकाणी ५ पेक्षा अधिक यूआरएल बंडल करायचे असल्यास थोडी अडचण होते .