गुगल हे असे काही माहीतीचे जाळे आहे की , त्याच्या पोटात काय दडलयं याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात गुगलचे फार मोठे स्थानही आहे. जे कुठेही शोधून सापडत नाही ते गुगलवर हमखास सापडते असा गुगलचा खाक्या आहे. पण शेवटी म्हणतात ना जे पेरणार तेच उगवणार. संगणक आणि वेबसाईटचेही तसेच आहे. जे त्यात फिड करणार तेच तेथे दिसत असते. म्हणूनच जर तुम्ही भाषांतरासाठी गुगलचा आधार घेणार असाल तर तुम्हाला खुप सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्याचे कारणही तसेच आहे.
गुगलवर सध्या किमान ६५ भाषांच्या भाषांतराची सुविधा नेटकरांसाठी उपलब्ध आहे. साहजिकच भाषेच्या बाबतीत तुम्ही नक्कीच विश्वभ्रमणाचा आनंद एका क्लिकवर घेऊ शकता. पण अचूक भाषांतराची बोंबच आहे. त्यामुळे एखादा मजकूर दुस-या भाषेत रुपांतरीत केल्यानंतर गुगलचा भाषांतराबाबतचा डब्बागोल तुम्हाला अनुभवता येतो.
सोनिया आणि निवडणूकांची सांगड घालणारे एक अजब भाषांतर गुगलने केले आहे.
( translate.gogle.com ) गुगलवर ‘ सोनियाजी आ रही है ‘ या वक्याचे इंग्रजी भाषांतर केल्यास Sonia is coming असे योग्य भाषांतर होते मात्र ‘ सोनिया जी आ रही है’, असे टाईप केल्यास ‘Coming Election’ असा त्याचा अर्थ गुगलचा ट्रान्स्लेटर दाखवत आहे.