ऑपरेटिंग सिस्टिमधील संधी
व्यवसायाच्या संधी खुणावत असल्याने फायरफॉक्स आणि उबंटू यांनीही या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केला आहे. मोबाइल ऑपेरटिंगच्या बाजारपेठेत आघाडीवर अ-सलेल्या आयओएस आणि अँड्रॉइडला यामुळे स्पर्धा मिळण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनने हा कम्प्युटरसारखे काम करावे , ही संकल्पना वापरून ‘ उबंटू ‘ आपले मार्केटिंग करीत आहे. त्यामुळे कम्प्युटरसारखाच अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर एकसारख्या पद्धतीने मिळण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. ‘ मोझिला ‘ ने फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमसाठी लो-एंड फोनना उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थात , यात स्मार्टफोनचा विचार कंपनीने केलेला आहे. कम्प्युटरवर एखादी वेबसाइट पाहण्याचा अनुभव मिळतो , तसाच अनुभव स्मार्टफोन मिळावा यासाठी कंपनी प्रयत्न करीत आहे.
‘ उबंटू ‘ ने अॅप्लिकेशन डेव्हलपर्सना मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी अॅप डेव्हलप करण्याचे निमंत्रण दिले आहे. यासाठी वेबकिटचा वापर करण्यात येणार आहे. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीममध्ये दीर्घकालीन उद्दिष्ट घेऊन ‘ कॅनोकल ‘ ही कंपनी उतरत आहे. त्यामुळे ‘ उबंटू ‘ या सिस्टीमसाठी हळूहळू पावले टाकीत कंपनी उद्दिष्टाच्या दिशेने वाटचार करती आहे.
‘ मोझिला ‘ च्या म्हणण्यानुसार अँड्रॉइड हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म नाही. मात्र , असा दावा गुगल कंपनीकडून केला जातो. बहुतेक डिझाइनचे निर्णय हे गुगल कंपनीने घेतलेले असतात आणि ते डेव्हलपर्सपुढे ठेवले जातात. त्यामुळेच’ मोझिला ‘ ची फायरफॉक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्यांना एक पर्याय ठरेल. कंपनीने यासंबंधीचे पहिले प्रारूप नुकत्याच झालेल्या ‘ कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो ‘ मध्ये ‘ झेटीई ‘ या कंपनीच्या मोबाइलवर दाखविले. फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलपमेंटच्या अखेरच्या टप्प्यात असून , पुढील काही आठवड्यांतच ती बाजारपेठेत उपलब्ध होईल. या दोन नव्या ऑपरेटिंग सिस्टिममुळे स्मार्टफोन युजरनी नवा आणि आणखी चांगला वेब अनुभव मिळण्याची अपेक्षा करायला हरकत नाही.