आयूसचा एमएक्स 279 एच मॉनिटर
‘आसूस’ने सीईएसमध्ये फुल एचडी एच आयपीएस एलईडी आणि फ्रेमलेस मॉनिटर सादर केला आहे. प्रीमिअम डिझाइन क्वॉलिटीचा हा मॉनिटर असून वजनाने खूप हलका आहे. 17.5 एमएम थिनेस्ट मॉनिटरचा खिताब मिळाला.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरियन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगचा बाजारात चांगलाच दबदबा आहे. सॅमसंगने 85 इंच ग्रांड अल्ट्रा हाय डेफिनिशन टीव्ही लॉन्च केला आहे. या टेक्नॉलॉजीचा हा जगातील पहिलाच टीव्ही आहे. त्यानंतर एलजी कंपनीनेही अशाच प्रकारचा टीव्ही बाजारात उतरविला आहे. परंतु तो दु दुसर्या स्थानी आहे. सॅमसंगच्या टीव्हीचा डिझाईन आवाज जबरदस्त आहे. या टीव्हीची किंमत 2 लाख ७ हजार रुपये इतकी आहे. सीईएस 2013 मध्ये या टीव्हीला ‘लार्जेस्ट टीव्ही’चा खिताब मिळाला आहे.
ई इंक आणि सेंट्रल स्टॅंडर्ड टायमिंग कंपनीने संयुक्तरित्या ‘सीएसटी-01’ या सर्वात स्लीम घड्याळ सीईएसमध्ये सादर केली होती. ही घड्याळ तयार करताना लवचीक कंपोनेंट्सचा वापर करण्यात आला आहे. या घडयाळाचे वजन फक्त 12 ग्रॅम असून जाडी 0.5 मिलीमीटर आहे. ही घड्याळ ब्रेसलेट अथवा बांगडीप्रमाणे हातात घालू शकतात. या घड्याळाची किंमत सात हजार रुपये आहे. एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 15 वर्षे
चालते.
सोनी कंपनीचा ‘एक्सपीरिया झेड’ हा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे. एक्सपीरिया झेड फुल्ली वॉटरप्रुफ आहे. त्यामुळे तुमचा फोन पाण्यात पडला तरी घाबरण्याचे काही कारण नाही.
ड्युयल साईड डिस्प्ले असलेला फोन एका रशियन कंपनी लवकरच लॉन्च करणार आहे. एक डिस्प्ले हाय रिझॉल्यूशन एलसीडी अँड्रॉयड फोन आणि दूसर्या साईडला इलेक्ट्रॉनिक पेपर आहे. त्यात तुम्ही पर्सनल इन्फॉर्मेशन, इमेजेज आणि तुमच्या गरजेच्या सर्व मॅटर सेव्ह करू शकतात. यंदा हा फोन बाजारात येण्याची शक्यता आहे
किकस्टार्टर कॅंपेनच्या माध्यमातून 85,000 पेबल ई-पेपर वॉचची ऑर्डर घेण्यात आली आहे. लाईट वेट, लहान, स्लीम, वॉटर रेजिस्टेंट स्मार्ट वॉचला लास वेगास येथील सीईएसमध्ये सादर करण्यात आली. येत्या 23 जानेवारीला या वॉचची डिलीव्हरी करण्यात येणार आहे. या घड्याळाला ब्लूटूथच्या माध्यमातून अॅपल आणि अँड्रायड फोनसोबत जोडता येऊ शकते. फोनवर टेक्स्ट एसएमएस आल्यानंतर घड्याळ वायब्रेट होते. अंधारातही या घडाळ्यावर एसएमएस दिसतो.
किंग्सटन कंपनीने एक टेट्राबाइट पेन ड्राइव्ह सादर केला आहे. याला तुम्ही नेक्सट जनरेशनचा पेन ड्राइव्ह म्हणू शकता. सुपर क्वॉलिटी असेल. नॉर्मल यूझर्स यात अनलिमिटेड डाटा सुरक्षित करू शकता
‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’मध्ये सोनीने 24.3 मेगापिक्सलचा एक शानदार कॅमेरा सादर केला आहे. 35 एमएमची फुल फ्रेम आहे. यात सीएमओएस सेंसर कॅमेरा वापरण्यात आला आहे. त्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिग देखील करू शकतात.