पण अॅपलच्या उत्पादनांचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आयट्यून पाहिजे आणि भारतात त्या उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे अॅपल युजर्सना ‘ थोडेसे कमी ‘ मिळत होते. पण आता ही कमतरताही दूर झाली आहे. अॅपलने भारतासाठी स्वतंत्र आयट्यून्स स्टोअर सुरू केले आहे.
एप्रिल २००३ पासून अमेरिकेत आयट्यून्स म्युझिक स्टोअरची सुरुवात झाली.
त्यात संगीत ,गाणी , चित्रपट विकत घेता येतात , तसेच भाड्यावरही घेता येतात. आतापर्यंत आयट्यून्स स्टोअरवर केवळ काही मोफत पुस्तके आणि पॉडकास्ट उपलब्ध होते. पण आता यावर आंतरराष्ट्रीय संगीतापासून बॉलिवूडपर्यंत सर्व काही मिळणार आहे.
त्यासाठी प्रत्येक गाण्याला ७ ते १५ रुपये मोजावे लागतील. फ्लिपकार्टवर प्रत्येक गाण्यासाठी १५ रुपये मोजावे लागतात. तसेच प्रत्येक अल्बमसाठी किमान ७० रुपये खर्च करावा लागेल. सर्वसाधारण दर्जाचे चित्रपट ८० रु. भाडे देऊन उपलब्ध आहेत तर विकत घेण्यासाठी २९० रु. मोजावे लागतील. एचडी फॉरमॅटमधील चित्रपट भाड्याने हवे असतील तर १२० रुपये आणि विकत घेण्यासाठी ४९० रु. मोजावे लागतील. मात्र इतर बाजारपेठांप्रमाणे येथे टीव्हीवरील कार्यक्रम मिळणार नाहीत.
हीच या सुविधेतील एक त्रुटी आहे. सोबतच अॅपलने आयट्यून्स मॅच ही सुविधादेखील भारतात लॉँच केली असून त्याद्वारे आयट्यून्सच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून घेतलेले संगीत आणि इतर गोष्टी आयक्लाऊडमध्ये साठवता येणार आहेत. मात्र त्यासाठी वर्षाला १ , २०० रु. शुल्क द्यावे लागेल.
आयट्यून्सला भारतात गाना डॉट कॉम , धिंगाणा डॉट कॉम वगैरे साइटचा सामना करावा लागेल. तर चित्रपटाच्या सेवेसाठी बॉक्स टीव्हीसारख्या साइटशी स्पर्धा करावी लागणार आहे.