नोव्हेंबर महिना वेब ब्राऊजर्सच्या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे . या महिन्यात तीन बड्या कंपन्यांनी आपल्या ब्राऊजर्सचया नवीन आवृत्या बाजारात आल्या आहेत . यात इंटरनेट एक्स्प्लोररची १०वी आवृत्ती मॉझिला फायरफॉक्स १७ आणि गुगल क्रोम २३ यांचा समावेश आहे . यात इंटरनेट एक्स्प्लोररने बाजी मारली असून गुगल क्रोमला मात्र उतरती कळा लागली आहे .
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोररच्या डाऊनलोडिंगमध्ये ० . ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर फायफॉक्सच्या डाऊनलोडिंग ० . ४५ टक्के घसरले आहे . तर क्रोमचे डाऊनलोडिंग तब्बल १ . ३१ टक्क्यांनी घसरले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे सफारी या ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०४ टक्के तर ओपेरा ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०७ टक्क्यांनी वाढले आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील निम्म्याहून अधिक युजर हे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत आहेत . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्स्प्लोरर हे ५४ . ७६ टक्के इतके वापरले जात आहे . उर्वरित टक्क्यांमध्ये इतर ब्राऊजर्सचा शेअर आहे . यात मॉझिला फायरफॉक्स आघाडीवर आहे . दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे एक्स्प्लोररचा वापर वाढल्याचे निरिक्षण अभ्यासात नोंदविण्यात आले आहे . याचा फायदा एक्स्प्लोररच्या नवव्या आवृत्तीलाही झाला आहे .याचा वापर करणा – यांची संख्याही कमालीची वाढली आहे . नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोरर नऊची युजर संख्या २० . ८० टक्के इतकी वाढली आहे . एक्स्प्लोररच्या नव्या व्हर्जन्समुळे जुन्या व्हर्जन्सचा वापर करणा – यांची संख्या घटत चालली आहे . पण नवीन व्हर्जन्समध्ये संख्यात्मक युजर्स अधिक असल्याचे निरिक्षणही यात नोंदविण्यात आले आहे .
क्राम आणि मॉझिल्याच्या ताज्या व्हर्जनपेक्षाही काही प्रमाणात मागसलेल्या असलेल्या एक्स्प्लोरर १०ची युजरसंख्या वाढणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते . मात्र विंडोज ८सोबत हे एक्स्प्लोरर देण्यात आल्यामुळे याचा वापर करणा – यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे .
एक्स्प्लोररखालोखाल फायफॉक्स ब्राऊजर लोकप्रिय आहे . याचा वापर करणा – यांची संख्या नोव्हेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधित युजर्सनी फायरफॉक्सची मदत घेतली आहे .फायरफॉक्स १७चा वापर वाढत असताना जुन्या व्हर्जन्सचा वापर मात्र कमी कमी होऊ लागला आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील २० . ४४ युजर्स मॉझिलाचा वापर करतात तर १७ . २४ टक्के लोक हे क्रामचा वापर करतआहेत . क्रामच्या २३व्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना मॉझिलाचे आणि एक्स्प्लोररचे जाळे भेदणे कठीण आहे . यामुळे पुन्हा एकदा एक्स्प्लोररने आपली नवी आवृत्ती बाजारात आणून आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे .