आयफोन
मोठ्या प्रमाणात चांगल्या अॅप्सची उपलब्धता हे आयफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे . अॅपलच्या अॅप स्टोअरवर ७ लाखाहून अधिक अॅप्स उपलब्ध आहेत . ब – याचशा प्रस्थापित कंपन्या सुरुवातीला आयफोनसाठी अॅप बनवतात नंतर अँड्रॉइडसाठी . कितीतरी काळ इन्स्टाग्राम फक्त आयफोनसाठीच उपलब्ध होतं . फेसबुकनेही त्यांचं नवीन अॅप सुरुवातीला फक्त आयफोनसाठी उपलब्ध करून दिलं नंतर अँड्रॉइडसाठी . ट्विटर आणि फेसबुकचे आयफोन अॅप अतिशय उत्तम आहेत . त्यामुळे पोस्ट टाकणं अगदीचसहज होतं . पासबुकसारखी काही आयफोनसाठीच बनविलेली अॅपही याठिकाणी आहेत . मोबाइल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्क्वेअर कंपनीने त्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे . याच्या सेटअपसाठी खूप वेळ लागत असला तरी फायदेही आहेतच . सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अॅपलच्या सिस्टीममध्ये उदा . की – बोर्ड बदलण्यासारखे फारसे बदल करू शकत नाहीत . त्यामुळे टेक सॅव्ही नसलेल्या किंवा ज्यांना फारसे बदल करायचे नसतील त्यांना याचा फायदा होतो .
अँड्रॉइड
अँड्रॉइडचा सर्वात मोठा प्लसपॉइंट म्हणजे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले मोबाइल्स . सँमसंग , एलजी ,मायक्रोमॅक्सपासून कितीतरी कंपन्यांचे अँड्रॉइड फोन बाजारात उपलब्ध आहेत . अगदी गुगलचा नेक्ससही तुमच्यासाठी हजर आहे . अँड्रॉइडचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे , तुम्हाला गरजेप्रमाणे यात बदल करता येतात . उदा . स्विफ्ट की हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले एक आघाडीचे अॅप आहे . यात तुम्ही गरजेप्रमाणे की- बोर्ड बदलू शकता किंवा तुम्ही कोणता शब्द टाइप करणार याचा अंदाज हे सॉफ्टवेअर व्यक्त करते . त्यातून टायपिंग जलद होऊ शकते . आणखी एक गोष्ट म्हणजे याठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या अॅप्स .अॅपल अॅप्स ही डेव्हलपरची पहिली पसंत असली तरी कित्येक अॅप्सला अॅपल मंजुरीच देत नाही . गुगलचं तसं नाही . त्यामुळे गुगलवरही जवळपास ७ लाख अॅप्स आहेत . विंडोज फोन आणि ब्लॅकबेरी हे देखील काही पर्याय आहेत . पण त्यांना अँड्रॉइड किंवा आयफोन इतक्या अॅप्सपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल .