पर्यावरणानुकूल
पेट्रोलियम गॅस किंवा अन्य इंधनाऐवजी जळाऊ लाकूड, कचरा या अपारंपरिक इंधनावर हा स्टोव्ह चालतो. परिणामी कमीत कमी कार्बन उत्सर्जन होते.
स्वच्छ, सुरक्षित ऊर्जा
विकसनशील देशांतील कुटुंबांना स्वच्छ, सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी बायोलाइटने कॅम्पस्टोव्ह तंत्रज्ञान विकसित केले आहे. जोनाथन सेडर, सीईओ
ग्रॅम वजनाचा आहे कॅम्पस्टोव्ह. त्यामुळे तो कुठेही सहजपणे नेता येतो. त्यामध्ये 21 बाय 21 सेंटिमीटर आकाराचे कुकिंग चेंबर आहे. वीजनिर्मितीसाठी वेगळे युनिट आहे. मागणीप्रमाणे वीजपुरवठा करणारे हे उपकरण आहे.
दशलक्ष लोकांना हरिकेन सँडी महावादळामुळे वीज गुल झाल्यामुळे फटका बसला होता. तेव्हा अमेरिकी लोकांनी बायोलाइट कॅम्पस्टोव्हची क्षमता पारखून पाहिली. त्यांनी स्वयंपाकही केला आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही चार्ज केल्या.
दशलक्ष लोकांचे जगभर अकाली मृत्यू होतात खुल्या आगीवर स्वयंपाक करताना भाजून. जगातील अर्धी लोकसंख्या खुल्या आगीवरच स्वयंपाक करते. परिणामी ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढत आहे. या समस्येवर कॅम्पस्टोव्ह हा चांगला पर्याय आहे.