मायक्रोसॉफ्टचा सर्फेस टॅब्लेट लॉन्च होण्याअगोदरच गुगल आणि सॅमसंगने आपला ‘दी कम्पप्यूटर फॉर एवरी वन’ बाजारात आणला आहे.गुगल क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार्या ‘क्रोमबुक’चे वजन अवघे दीड किलो आहे. साडेसहा तास बॅटरी बॅकअप मिळणार आहे. मात्र अन्य क्रोमबुकप्रमाणे नव्या क्रोमबुकमध्ये हार्ड ड्राइव्हसाठी जागा देण्यात आलेली नाही. युजर्सला यासाठी इंटरनेट कनेक्शनवरच निर्भर राहावे लागणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या लॅपटॉपमध्ये ड्युअल वाय-फाय कनेक्टव्हीटी मिळेल.गुगलचा नवा लॅपटॉप दिसायला आकर्षक आहे. वजनाला हलका आणि अन्य लॅपटॉपच्या तुलनेत अतिशय स्लीम आहे. नया क्रोमबुक 10 सेकंडांपेक्षा कमी वेळात बूट होतो. यात 1080 पिक्सलवर हाय रिझोल्यूशनचे व्हिडिओ देखील पाहता येऊ शकतात. याच्या टचपॅडमुळे आपल्याला स्मूद स्क्रोलिंग आणि शानदार हार्डवेअरचा अनुभव घेता येणार आहे
.
नव्या क्रोमबुकची स्क्रीन 11.6 इंचांची असून 1366×768चे रिझोल्यूशन आहे. यात सॅमसंगचे Exynos5 ड्युअल प्रोसेसर देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ 3.0,HDMI पोर्ट, VGA कॅमरा आणि बिल्ट इन ड्युअल Wi-fi 802.11 a/b/g/n ची सुविधा देण्यात आली आहे.