तुमचा आयफोन, आयपॅड किंवा आयपॉड टच करा अपडेट

सध्या तुम्ही आयफोन , आयपॅड किंवा आयपॉड टच वापरत असाल आणि आयफोन ५ वापरण्याची तुमची इच्छा असेल पण घेण्याची तयारी नसेल तर तुमच्यासाठी अॅपलने २०० नवीन फिचर्स असलेली आयओएसची ६ अॅप्स मार्केटमध्ये उपलब्ध केली आहे. त्यातील काही मोजके फिचर्स वगळता सर्व तुमच्या सध्याच्या फोनवर चालू शकतात. 

नव्या आयओएसमध्ये असणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयफोनधारक रात्रीची झोप शांततेत घेऊ शकतात. फोन सायलंट मोडवर टाकल्याशिवायही तुम्ही फेसबुक , इमेल अलर्ट सायलंट मोडवर टाकू शकतात. डू नॉट डिस्टर्ब हे फिचर काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे आवाज बंद करू शकते. त्यात तुमच्या आवडत्या व्यक्तीने कॉल केला तरच रिंग वाजविण्याची किंवा ३ मिनिटाच्या कालावधीत २ वेळा कॉल आला तर रिंग वाजविण्याची सुविधा उपलब्ध आहे. ठराविक वेळेपुरतीही रिंग वाजविण्याची सुविधा या फिचरमध्ये उपलब्ध आहे. 

पॅनोरमा 
पॅनोरमा हे फिचर वापरून तुम्ही पॅनोरमा फोटो काढू शकता. आयफोन ४एस आणि नवीन आयपॉड टचमध्ये हे फिचर वापरता येते. त्यात कॅमेराच्या ऑप्शन्समध्ये जाऊन पॅनोरमा हे फिचर सिलेक्ट केल्यावर स्क्रीनवर एक आकृती येईल. त्यानुसार कॅमेरा लेफ्ट टू राइट पॅन करून तुम्ही पॅनोरमा फोटो काढू शकता. 

सोपे शेअरिंग 
आतापर्यंत आयओएसमध्ये फेसबुकचे फोटो शेअर करण्यासाठी फेसबुक ओपन करून फोटो अॅपमध्ये निवडून शेअर करावा लागत होता. मात्र आयओएस ६ मध्ये शेअरिंग अतिशय सोपे करण्यात आले आहे. थेट फोटोवर क्लिक करून तुम्ही फोटो शेअर करू शकाल. त्याचप्रमाणे तुमच्या मेलवर फोटो आणि व्हिडीओ अॅड करू शकाल. 


अॅप्स स्टोअर 
सध्या अॅपलच्या अॅप्स स्टोअरमध्ये ७ लाख अॅप्स आहेत. पण नव्या आयओएसमध्ये अॅप्स स्टोअरची नव्याने रचना करण्यात आली असून त्याच अॅप्सची गर्दी अजिबात दिसत नाही. सर्च केल्यावरही स्क्रीनवर एकच अॅप दिसते आणि ते स्क्रॉल केल्यावर दुसरे. आधीच्या अॅप स्टोअरमध्ये स्क्रॉल डाऊन करावे लागत होते. पण नव्या प्रकारात तुम्ही यापूर्वी वापरलेल्या अॅप्स वरून तुम्हाला अॅप्स सुचविली जातात. 

सिरी 

अॅपलमधील व्हॉईस असिस्टंट सिरी अपडेट करण्यात आला असून आयफोन ४ एस , आयपॅड आणि आयपॉड टचवर हा उपलब्ध आहे. सिरी अॅप्स ओपन करण्याबरोबरच इतर अनेक गोष्टी करते. मात्र अजूनही काही त्रुटी यामध्ये आहेत. 

वायफायपासून मुक्तता 
आता तुम्हाला फेसटाइम व्हिडीओ चॅटसाठी वायफायवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सिमकार्डच्या इंटरनेटवरूनही हे चॅट करू शकता. आयफोन ४ एस आणि ५ वर यासुविधा उपलब्ध आहेत

Exit mobile version