फ्रॅंकफर्ट- कोरियन मोबाईल कंपनी ‘सॅमसंग’ने नुकताच ‘गॅलेक्सी एस 3 मिनी’ लॉन्च केला. जर्मनीतील फ्रँकफर्ट शहरातील बाजारात 11 ऑक्टोबरला ‘गॅलेक्सी एस 3 मिनी’ दाखल झाला. ‘गॅलेक्सी एस 3 मिनी’ हा बाजारात दाखल झाल्याने सॅमसंग आणि अॅपल यांच्यात स्पर्धा वाढण्याचे संकेत मिळत आहे. 4 इंचाची स्क्रीन असलेला हा स्मार्टफोन ‘गॅलेक्सी एस 3’चे लहान व्हर्जन आहे. ‘एस 3 मिनी’ मध्ये अॅडव्हान्स हार्डवेयर आहे. या स्मार्टफोनमध्ये रॅम क्षमता वाढविण्यात आली असून अँड्राइड 4.1 व्हर्जनने अद्ययावत आहे.
‘गॅलेक्सी एस 3 मिनी’ या अत्याधुनिक डिव्हाइसमध्ये ‘गॅलेक्सी एस 3’ आणि ‘नोट 2’ प्रमाणेच ‘पेबल’ डिझाइन लँग्वेज आहे. परंतु, 4- इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्लेमुळे ‘गॅलेक्सी एस 3 मिनी’ लूक जरा हटके आहे. ‘गॅलेक्सी एस 3 मिनी’मध्ये नेचर यूआयसोबत अँड्राइड 4.1 (जेली बीन) हे अद्ययावत व्हर्जन आहे. यात 1 गीगा हर्ट्ज ड्युअल कोर प्रोसेसर आहे. ‘एस 3’मध्ये 1.4 गीगा हर्ट्ज प्रोसेसर आहे.
सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 GB ची इंटरनल मेमोरी आहे. ती 32 GBपर्यंत वाढविता येते’गॅलेक्सी एस 3 मिनी’चा रिअर कॅमरा 5 मेगापिक्सलचा आहे. तसेच 1,500mAhची बॅटरी आहे. ‘एस 3’ मध्ये 2,100mAhची बॅटरी आहे. एनएफसी, 4जी, 3जी, 2जी, ब्लूटूथ 4.0 आणि एस बीम सारख्या कनेक्टिव्हिटी सुविधा देण्यात आल्या आहेत.’गॅलेक्सी एस 3 मिनी’मध्ये ‘एस व्हॉईस’ नावाचे डिजिटल व्हॉईस असिस्टेंट आहे. सॅमसंगने अँपलच्या ‘सिरी व्हाईस’ कमांडला टक्कर देण्यासाठी हे डिजिटल व्हॉईस डेव्हेलप केले आहे.