
माझ्याकडेसुद्धा सोनीचाच मोबाइल आहे. आवाज, टच, कॅमेरा सर्व बाबतीत खरच बेस्ट असतात सोनी उत्पादने.
सोनीचा हा फोन अँड्रॉइड 4.0 आइस क्रीम ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. त्यात 800 मेगाहर्ट्झचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 3.5 इंचांचा आहे. त्याचे रेझोल्युशन 320 x 480 आहे. मायरोची इंटर्नल मेमरी 4 जीबी असून, ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनची रॅम 512 एमबी आहे. एक्सपिरिया मायरोमध्ये एक फ्रंट फेसिंग कॅमेरादेखील आहे. फोनचा 5 मेगापिक्सल ऑटोफोकस कॅमेरा एलइडी फ्लॅशसह 2592 x 1944 पिक्सलची छायाचित्रे टिपतो. वायफाय, वायफाय हॉटस्पॉट, ब्लूटूथ, यूएसबी टेथरिंग, डीएलएनए सर्टिफाइड हे या फोनचे इतर फीचर्स आहेत.