एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) यांनी आता विविध ठिकाणच्या बससाठी ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध करून दिली असून वेबसाइट, ॲपद्वारे आपण तिकीट आरक्षण करू शकाल. यामध्ये AC, NON AC, Ordinary, Lalpari, Night Express, Semi Luxury, Hirkani, Vithai, Shivneri, AC Shivshahi, AC Shivneri, AC Ashwamedh, AC Sleeper, AC Electric Shivai अशा सर्व गाड्यांचं रिजर्वेशन करता येईल! यासाठी आपल्याला नेटबँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्ड, UPI असे पर्याय मिळतील. शिवाय आपण आता रेडबस, अभिबस अशा इतर ॲप्स मधूनही एसटी बसचं बुकिंग करू शकाल!

एस. टी.चे वेळापत्रक माहिती नसते, बसस्थानकावर दूरध्वनी लावला तर तो व्यस्त किंवा व्यवस्थित ऐकू येत नाही. अशा स्थितीत स्थानकावर जाऊनच बसच्या वेळेची माहिती घ्यावी लागत होती; परंतु आता मोबाईलवर व वेबसाईटवर वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी पाऊल उचलले आहे SMS सेवा आता वापरात नसून त्याऐवजी महामंडळाची वेबसाइट/ॲप वापरू शकता. (Update July 2024)

आता एसटीच्या तिकीटाचं पेमेंट बसमध्येच UPI द्वारेही करता येतं!

MSRTC चं पूर्वीचं ॲप आता बंद करण्यात आलं असून नवं ॲप उपलब्ध करून दिलं आहे.

आवडेल तेथे कोठेही प्रवास, मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पास, महत्वाच्या मार्गांवरील बस भाडे आणि बस सेवांची भाडे आकारणी संरचना, रा. प. महामंडळाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सवलती, परिपत्रक ज्येष्ठ नागरिक सवलती बाबत, स्मार्ट कार्ड अटी व शर्ती इ. माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.

रेडबसवरून बुकिंग केल्यास २० टक्केपर्यंत सूट व १०० रु कॅशबॅक मिळवा.
यासाठी पुढील लिंकवर जा : redbus Special Offer 

⚠ इथून खालील लेख आता कालबाह्य झाला आहे याची नोंद घ्यावी.

बसच्या वेळापत्रक मोबाईलच्या एका बटनावर आता उपलब्ध होणार आहे. GET-jalgaon nasik असे टाइप करून 54646 क्रमांकावर संदेश पाठविल्यास जळगावहून नाशिकला जाणाऱ्या दिवसभरातील गाड्यांची माहिती उपलब्ध होईल.
उदा. तुम्हाला सोलापूरहून पुण्याला जायचं असेल तर GET-solapur pune हा मेसेज 54646 वर पाठवा.
जेथून जावयाचे आहे, त्या गावाचे नाव व कोणत्या गावाला जायचे आहे त्याचे नाव टाइप केल्यास संपूर्ण वेळापत्रक उपलब्ध होईल.

याशिवाय www.msrtc.gov.in या वेबसाइटवरही माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अगदी ग्रामीण भागातील वेळापत्रकही उपलब्ध करण्यात आले आहे.

msrtc st bus timing in marathi booking

Exit mobile version