स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याची क्षमता वाढवाचीय ? मग वापरा हे पर्याय .

स्मार्टफोनच्या इन-बिल्ट कॅमेर्‍यांचे रेझोल्युशन मर्यादित असते. अशावेळी उपयोगकर्ते हायस्पीड कॅप्चर, पॅनोरमा आणि दुसरे फिल्टर जोडून स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याची क्षमता वाढवू शकतात.
हाय-स्पीड बर्स्‍ट 
ब्रस्‍ट मोडद्वारे लागोपाठ अनेक छायाचित्रे
काढली जाऊ शकतात. अनेक कॅमेरा फोनमध्ये शटर लॅग फीचर असते. अशावेळी बर्स्‍ट मोड अनेक पर्यायांपैकी एक निवडण्याची संधी देतो. तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये नसेल तर तुम्ही कॅमेरा
एक्स अँप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता. ते मोफत उपलब्ध आहे. आयओएससाठी कॅमेरा ऑसम आणि विंडोज फोन उपयोगकर्ते टबरे कॅमेर्‍याद्वारे बर्स्‍ट मोड इन्स्टॉल करू शकतात.
टाइम लॅप्स
तुम्ही टाइम लॅप्स व्हिडिओ पाहिले असतील.
या तंत्रज्ञानाद्वारे उपयोगकर्ते फोटोग्राफच्या सिक्वेन्सद्वारे व्हिडिओ बनवू शकतील.
लॅप्स अँप्लिकेशनद्वारे (अँड्रॉइड व आयओएससाठी मोफत) उपयोगकर्ते आपला फोन टाइम लॅप्स
बनवू शकतात. त्याच्या सशुल्क ‘प्रो’ आवृत्तीद्वारे इतर अनेक फीचर्सदेखील (एचडी रेझोल्युशन
टाइम लॅप्स व्हिडिओ) उपलब्ध आहे.
पॅनोरमा
कधीकधी केवळ वाइड अँगल फोटोग्राफने काम
भागत नाही. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या एखाद्या लँडस्केपचे छायाचित्र टिपण्यासाठी
एक्स्ट्रा वाइड अँगलची गरज असते. अशावेळी कामी येतात पॅनोरमा अँप्लिकेशन्स. जर तुमच्याकडे
अँड्रॉइड किंवा आयओएस उपकरण असेल, तर तुमच्यासाठी
360 पॅनोरमा अँप्लिकेशन उपयुक्त आहे. त्याद्वारे रिअल टाइम पॅनोरमा निर्माण करू शकता.
पर्यायांमध्ये मायक्रोसॉफ्टचे फोटोसिंथ (आयओएस आणि विंडोज फोन 7 साठी मोफत) आणि जिटिच (विंडोज फोन 7.5 साठी मोफत) उपलब्ध आहेत.
 
 स्टॉप  मोशन 
स्टॉप मोशन अँनिमेशन हे स्थिर चित्रांचे
चलतचित्रांमध्ये रूपांतर करण्याचे रंजक माध्यम आहे. स्टोमो (आयओएससाठी मोफत) अशीच सुविधा देते. अशाच प्रकारे रेकॉर्डेड व्हिडिओमधून इमेज तयार करण्यासाठी सिनेमाग्राम
या मोफत अँप्लिकेशनचा उपयोग करता येतो. अँड्रॉइड उपयोगकर्ते क्लेफॉर्मस आणि स्टॉप-मोशन
वापरून पाहू शकतात.
अँडिशनल मोड्स
स्टँड अलोन डिजिटल कॅमेर्‍यामध्ये स्मार्टफोनपेक्षा
अधिक फीचर्स असतात. उदा. स्माइल डिटेक्शन, सेल्फ
टायमर आणि मल्टिपल सीन मोड. यापैकी बहुतेक फीचर्स तुम्ही अँप्लिकेशनच्या साहाय्याने
स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याशी जोडू शकता. आयओएसवर आयबूथद्वारे सेल्फ टायमर सेट करू शकता.
अँड्रॉइडच्या पिक्सलर अँप्लिकेशनद्वारे स्माइल शॉट मोड, ब्यूटी
शॉट मोड आणि मल्टिपल सीन मोड स्मार्टफोनच्या कॅमेर्‍याला जोडता येतात. यूकॅम अँप्लिकेशनद्वारे
व्हाइट बॅलन्स, फोकस, एक्सपोझर, टाइम स्टॅम्प आणि सेल्फ टायमरशिवाय अनेक पिक्चर मोड जोडता येतात. विंडोज फोनचे उपयोगकर्ते फोटोरूम अँप्लिकेशनचा वापर करू शकतात. ते मोफत उपलब्ध आहे.
रिअल टाइम फोटो फिल्टर
पॉवरकॅमद्वारे अँड्रॉइड व आयओएस उपयोगकर्ते फोटो फिल्डर्स जोडू शकतात. पॉवरकॅमद्वारे परिणाम साधून फोटो किंवा व्हिडिओ घेण्यापूर्वीच ते कसे येतील हे पाहता येते.
नोंद : ह्या लेखात व्याकरणदृष्ट्या अनेक चुका आहेत.परंतु हा लेख दिव्य मराठीच्या वेबसाइटवरुन घेतलेला असल्यामुळे त्यात बदल करता येवू शकत नाही 
 
सौजन्य:  
Exit mobile version