BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

BIG LAUNCH: नोकिया, अ‍ॅपल, एलजीनंतर स्‍मार्टफोनच्‍या युद्धात आता HTC चीही उडी

          स्‍मार्टफोनच्‍या दुनियेत आता काटयाची लढत पाहायला मिळण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सप्‍टेंबर महिन्‍यात नोकिया ल्‍युमिया, आयफोन 5 आणि एल जी ऑप्टिमस नंतर आता एचटीसी ही आपला स्‍मार्टफोन बाजारात लॉंच करण्‍याच्‍या तयारीत आहे. एचटीसी 8 एक्‍स आणि 8 एस हे नवे मॉडेल बाजारात आणत आहे. विन्‍डोज 8 या ऑपरेटिंग सिस्‍टमबरोबर बाजारात येणा-या या फोनच्‍या निर्मितीमध्‍ये मायक्रोसॉफ्टने विशेष सहभाग घेतला आहे. या नव्‍या फोनचे डिझाईनही एकदम खास आहे. 


                                विंडोज 8 बाजारात आल्‍यानंतर नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या सुरूवातीला हा फोन लॉंच होईल. याच्‍या किंमतीबाबत अजून काही सांगण्‍यात आले नसले तरी सूत्रांकडून मिळालेल्‍या वृत्तानुसार हा फोन 199 डॉलर (सुमारे 12 हजार रूपये) असेल. HTC 8x ला 3D युनीबॉडीचा आकार देण्‍यात आला आहे. यामध्‍ये तुम्‍हाला विंडोज-8 लाईव्‍हची सुविधा मिळेल.
                               HTC 8x मध्‍ये f/2.0 अर्पचरबरोबर 2.1 मेगापिक्‍सलाचा फ्रंट कॅमेरा आहे. हा कॅमेरा अल्‍ट्रा वाईड अँगल आहे. ज्‍यामध्‍ये तुम्‍हाला 1080 पिक्‍सलवर व्हिडिओ शुटिंग करता येते. याचा रिअर कॅमेरा 8 मेगापिक्‍सलचा आहे. CMOS सेन्‍सरमुळे कमी प्रकाशातही या कॅमे-याने चांगले फोटो काढता येतात. दोन्‍ही कॅमेरे एका अर्पचरवर काम करतात.श्रवणीय संगीताचा अनुभव घेण्‍यासाठी यामध्‍ये खास सुविधा पुरवण्‍यात आली आहे. यामध्‍ये स्‍टुडिओ क्‍वॉलिटीचा ऑडिओ ऐकण्‍यास मिळेल.फोनची HD रिझोल्‍यूशन सुपर LCD 2 कॅपे‍सिटीव्‍ह मल्‍टीटच स्‍क्रीन ही 4.3 इंच इतकी आहे. जी गोरिल्‍ला ग्‍लास 2 प्रोटेक्‍टेडने बनवण्‍यात आली आहे. याचे रिझोल्‍यूशन 720×1280 इतके आहे.
8x मध्‍ये 1.5 GHz चे क्‍वॉलकॉम डुयल कोअर Snapdragon S4 चा प्रोसेसर लावण्‍यात आला आहे. त्‍याला 1 जीबी रॅमही लावण्‍यात आलेली आहे.याची इंटर्नल मेमरी क्षमता 16 जीबी असून त्‍याला 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतेकनेक्‍टीविटीसाठी फोनमध्‍ये ब्‍ल्‍यूटूथ, वायफाय, NFC आणि मोबाईल हॉटस्‍पॉट सारख्‍या सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत.

Exit mobile version