दिसायला 4 एससारखाच असला, तरी हा फोन वजनाने त्याच्यापेक्षा 20 टक्क्यांनी हलका आणि 18 टक्क्यांनी स्लीम आहे. त्याच्या स्क्रीनची लांबी 4 इंच इतकी आहे. आयफोन-5 गुगल मॅपऐवजी स्वतःची मॅप सेवा वापरणार आहे. ग्लास व अँल्युमिनियमपासून तो बनवलेला आहे. अमेरिकेत खरेदीसाठी प्री-ऑर्डर 14 सप्टेंबरपासून सुरू होईल. याशिवाय 28 देशांत तो 28 सप्टेंबरपासून मिळू शकेल. भारताबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. याशिवाय आय ट्यून्सचे नवे व्हर्जन, आयपॉड नॅनो, आयपॉड टच ही उत्पादनेही लाँच करण्यात आली. सहा वर्षांपूर्वी स्टीव्ह जॉब्स यांनी याच शहरात पहिला आयफोन लाँच केला होता. तेव्हापासून जगात 24 कोटी आयफोन विकले गेले. आजवर आयफोनचे 6 मॉडेल सादर करण्यात आले आहेत. आयफोन 5 मुळे अँपलचा शेअर 683 डॉलरवर गेला आहे.
मोफत अपडेट : आयफोन थ्री जीएस, फोर, 4 एस, न्यू आयपॉड, आयपॉड 2 हे 19 सप्टेंबरपासून आयओएस 6 मध्ये मोफत अपडेट केले जातील.
अॅपलच्या उत्पादनाविषयी दरवेळी बाजारात वेगवेगळया बातम्या येत असतात. गेल्याच आठवडयात अॅपल बाबतीत काही अफवा पसरल्या होत्या. आयफोन- 5 लॉंचिंगनंतर प्री-ऑर्डरवर स्टोअरमधून लगेचच उपलब्ध होईल.
4जी एलटीई- नव्या आयपॉडप्रमाणेच आयफोन-५ मध्ये 4 जी सेवा वापरता येईल. याआधी न्यू आयडमध्ये ४जी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
आयओएस 6- गेल्या उन्हाळ्यात अॅपलच्या जागतिक परिषदेत याची घोषणा करण्यात आली होती. ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही आयफोन-५ मध्ये असेल.
आयपॉडचे नवे रुप- आयपॉडची नवी रेंजही यावेळी लॉंच करण्यात आली. आयपॉड नॅनो आणि आयपॉड टच लॉंच करण्यात आले आहेत. नॅनोची टचस्क्रीन २.५ इंचाची असेल.यामध्ये ब्ल्यू-टूथही देण्यात आले आहे. याची बॅटरी ३० तासांपर्यंत चालू शकते. विशेष म्हणजे यात एफएम रेडिओही देण्यात आला आहे.आयपॉड टचमध्ये ४ इंचाचा रेटिन डिस्प्ले आहे. पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईटही देण्यात आला आहे.
आय ट्यून्सचे नवे डिझाईन – आयट्यून्सच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आला. देश-विदेशातील सुमारे २०० मिलियन युजर्स हे रोज आयट्यून्सचा वापर करीत असतात. आयट्यून्स ११ येत्या ऑक्टोबरमध्ये लॉंच करण्यात येईल. त्यामध्ये आयक्लाऊडचे इंटिग्रेशनही करण्यात येणार आहे….