हॉटमेलच्या नामकरणानंतर नवख्या आउटलूक.कॉम ला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या सहा तासात तब्बल एक दशलक्षहून अधिक लोकांनी साइन अप (नवीन सभासद होण्याला Sign Up असे म्हणतात )केलं आहे. जीमेलसारख्या व काही अधिक सुविधायुक्त अशी ही सेवा सोशल नेटवर्किंगला(Facebook, Twitter, LinkedIn, Google +, Skype ) अधिक जवळची म्हणजे ह्या सेवेतच वापर करण्याची मजा मिळवून देते.
ह्याचा मुख्य भाग अधिक सुटसुटीत केल्यामुळे त्यावर 30% जास्त ईमेल दिसतात.
मायक्रोसॉफ्टने नवीन उत्पादनांचा धडाका लाऊन दिला आहे. प्रथम सर्फेस टॅब्लेट , ऑफिस 2013,विंडोज 8,आता आउटलूक.कॉम. अॅपलच्या वाटचालीला हे आव्हान किती प्रमाणात अडसर ठरू शकते ते बघण्यासाठी सहा सात महीने तरी वाट पहावी लागणार
Official Tweet :